नाशिक : शहरात 71 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय

गणेश विसर्जन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम तसेच उपाययोजना केल्या जात आहेत. नदीपात्र प्रदूषित होऊ नये, यासाठी मनपाकडून शहरासह परिसरात 71 ठिकाणी नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे.

31 ऑगस्टपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने शहरातील सर्व सहा विभागांत एकूण 71 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात. तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करण्यात यावे.

कृत्रिम स्थळे दहाव्या दिवसासाठीच :
नागरिकांना दीड, तीन, पाच, सात दिवसांच्या मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रिम विसर्जन स्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जनाकरताच उपलब्ध असतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

विसर्जनासाठीची ठिकाणे अशी : घनकचरा व्यवस्थापन विभाग –

नाशिक पूर्व : नैसर्गिक तलाव – 1. लक्ष्मीनारायण घाट (प्र.क्र.15), 2. रामदासस्वामी मठ (प्र.क्र. 16), 3. नंदिनी गोदावरी संगम (प्र.क्र. 23). कृत्रिम तलाव : 1. लक्ष्मीनारायण घाट, प्र.क्र. 15, 2. रामदासस्वामी मठ, प्र.क्र. 16, 3. रामदास स्वामीनगर लेन-1, बस स्टॉपजवळ – 1, प्र.क्र. 16, 4. नंदिनी गोदावरी संगम, प्र.क्र. 16, 5. साईनाथनगर चौफुली, प्र.क्र. 23, 6. डीजीपीनगर गणपती मंदिराजवळ (प्र.क्र. 23), 7. शारदा शाळेसमोर, राणेनगर,प्र.क्र.30, 8. कलानगर चौक, राजसारथी, प्र. क्र. 30.

नाशिकरोड : नैसर्गिक तलाव – 1. दसक घाट, प्र. क्र. 18, 2. चेहडी गाव दारणा नदी, प्र.क्र. 19, 3. देवळाली गाव वालदेवी नदी, प्र.क्र.22, 4. विहितगाव वालदेवी नदी,प्र.क्र.22, 5. वडनेर गाव वालदेवी नदी,प्र.क्र.22. कृत्रिम तलाव : 1.नारायण बापू चौक, प्र.क्र. 17, 2. चेहडी ट्रक टर्मिनल, प्र.क्र.19, 3. निसर्गोपचार केंद्र जयभवानीरोड, प्र.क्र.20, 4. शिखरेवाडी ग्राउंड, प्र.क्र.20 5. गाडेकर मळा, प्र.क्र.21, 6. मनपा शाळा क्र. 125, प्र.क्र. 21, 7. राजराजेश्वरी चौक सायखेडा रोड, प्र.क्र. 18, 8. के एन.केला शाळेमागील प्रस्तावित भाजी मार्केट, प्र.क्र.20

पंचवटी : नैसर्गिक तलाव – 1. म्हसरूळ सीतासरोवर, प्र.क्र.1, 2. नांदूर मानूर, प्र.क्र.2, 3. आडगाव पाझर तलाव, प्र.क्र.2, 4. तपोवन, प्र.क्र.3, 5. रामकुंड परिसर, प्र.क्र.5, 6. म्हसोबा पटांगण, प्र.क्र.5, 7. गौरी पटांगण, प्र.क्र. 5, 8. टाळकुटेश्वर सांडवा, प्र.क्र.
5. कृत्रिम तलाव : 1. राजमाता मंगल कार्यालय, प्र.क्र.1, 2. गोरक्षनगर, आरटीओ कॉर्नर), प्र.क्र.1, 3. आर.टी.ओ., पेठ रोड, प्र.क्र.1, 4. कोणार्कनगर, प्र.क्र.2, 5. प्रमोद महाजन गार्डन, प्र.क्र.3, 6. रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी, प्र.क्र. 6.

सिडको : नैसर्गिक तलाव – 1. पिंपळगाव खांब वालदेवी घाट प्र.क्र.31.
कृत्रिम तलाव : 1.गोविंदनगर जिजाऊ वाचनालय प्र.क्र. 24, 2. राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ, जुने सिडको, प्र.क्र. 24, 3. पवननगर जलकुंभ, हिरे शाळेजवळ प्र.क्र. 25, 4. राजे संभाजी स्टेडियम, सिंहस्थनगर सिडको प्र.क्र. 27, 5. मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा, प्र.क्र.28, 6. डे केअर शाळा, रामनगर, राजीवनगर प्र.क्र.31, 7. राजे संभाजी महाराज व्यायामशाळेजवळ कर्मयोगीनगर प्र.क्र.24.

नाशिक पश्चिम : नैसर्गिक तलाव – 1. यशवंतराव महाराज पटांगण प्र.क्र.13, 2. रोकडोबा पटांगण, 3. कपूरथळा पटांगण, 4. गाडगे महाराज धर्मशाळा, 5. टाळकुटेश्वर पटांगण, 6. सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, 7. हनुमान घाट, घारपुरे घाट. कृत्रिम तलाव : 1. चोपडा लॉन्स पूल, गोदापार्क, 2. चव्हाण कॉलनी, परीची बाग, 3. फॉरेस्ट नर्सरी, गंगापूर रोड, 4. बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, 5. दोंदे पूल, उंटवाडी रोड, 6. महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, 7. लायन्स क्लब, पंडित कॉलनी, 8. शीतलादेवी टाळकुटेश्वर मंदिर.

सातपूर : नैसर्गिक तलाव – 1. गंगापूर धबधबा, 2. गंगापूर अमरधाम, 3. सोमेश्वर, 4. चांदशी पूल, 5. मते नर्सरी. कृत्रिम तलाव : 1. पाइप लाइन रोड, रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ, 2. शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी, 3. अशोकनगर पोलिस चौकी, 4. नंदिनी-नासर्डी नदी पूल, सातपूर-अंबड लिंक रोड, 5. नंदिनी-नासर्डी नदी पूल, आयटीआय पूल, 6. शिवाजीनगर पाझर तलाव.

हेही वाचा:

The post नाशिक : शहरात 71 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय appeared first on पुढारी.