Site icon

नाशिक : शहीद पोलिसांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशाच्या प्रती आपले कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिन पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. या स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी (दि.२१) नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस कवायत मैदान येथील शहीद पोलीस स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

पालकमंत्री भुसे म्हणाले, 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे हॉटस्प्रिंग याठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला होता. त्यावेळी या शूर शिपायांनी शत्रुशी निकराने लढा देत देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलातर्फेे स्मृतीदिन म्हणून पाळला जातो, अशा शब्दांत भुसे यांनी आजच्या दिवसाचे महत्व विषद केले.

याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मैदानावर उपस्थित पोलीस दलातील कर्मचारी यांनीही शहिदांना मानवंदना दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : शहीद पोलिसांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन appeared first on पुढारी.

Exit mobile version