
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दुसऱ्या दिवशी शालिमार परिसरासह आरके, धुमाळ पॉइंट, एमजी रोड, सीबीएस परिसरात धडक मोहीम राबवित परिसरातील अनधिकृत टपऱ्यांची उचलबांगडी केली. विभागाने सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केल्याने परिसरातील विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. शालिमार परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने, या परिसरात रहदारीचा मोठा अडथळा ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन सहाही विभागांचे अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहनांच्या मदतीने या भागातील अतिक्रमण हटविले. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कारवाईदरम्यान व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले. या विशेष कारवाईप्रसंगी मनपाच्या सहाही विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाहनांच्या ताफ्यासह हजर होते. याप्रसंगी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा :
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : बोरघाट उतरताना ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला
- Shinde Sarkar news | मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग आता मोकळा, शिंदे गटासह भाजपमधूनही मंत्री होण्यासाठी अनेक दावेदार
- Cyclone Mocha | मोचा बनले अतिशय तीव्र चक्रीवादळ, ‘या’ राज्यांत मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
The post नाशिक : शालिमार येथील अनधिकृत टपऱ्या हटविल्या appeared first on पुढारी.