Site icon

नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी

शालेय पोषण आहार बनविण्यासाठी लागणारे खाद्य तेल, हिरवा भाजीपाला व इंधन खर्च दर महिन्याला देण्यात यावा. नांदगाव तालुक्यातील विविध शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून काम करतो. त्यानुसार या कामासाठी खाद्य तेल, हिरवा भाजीपाला व इंधन खर्च शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत असे सात महिन्यापासून मिळालेलाच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना दुकानदार देखील वस्तू देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने महिलांना नाईलाजाने पोषण आहार बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला खाद्य तेलासह हिरवा भाजीपाला व इंधन खर्च देण्यात यावा. अशा आदी मागण्यांसाठी नांदगाव पंचायतसमिती महिलांनी आंदोलन छेडत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनातील विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या समोर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे. निवेदनावर संगीता सोनवणे, आशा काकळीज, सरला मोढे, संगीता गुंजाळ, संगीता मोकळ, शोभा भोसले, वंदना बाहिकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : शालेय पोषण आहार समितीचे पंचायत समिती आवारात आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version