नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

सिडको निवेदन www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोचणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थंडीचा कालावधीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा एक तास उशिराने भरवावी. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले.

शहराचा पारा ९.८ अंशांवर गेला असून बहुतांश वेळी २ ते ५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा जात आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागात बहुतांश शाळेची वेळ सकाळी सुरु होण्याची असल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी घरातून ६ ते ८ च्या दरम्यानच बाहेर पडावे लागते. पहाटे धुके व दवबिंदूमुळे थंड वाऱ्यांचा वेगही अधिक असतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीकोनातून शाळा किमान एक तास उशिराने भरण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दो करण्यात आली आहे. छावा क्रांतीवीर सेना संस्थापक करण गायकर, युवक प्रदेश अध्यक्ष नवनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  नाशिक जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे  छावा क्रांतीवीर सेनाचे नाशिक शहर अध्यक्ष योगेश गांगुर्डे, सागर जाधव, दिनेश नरवडे, बंटी पाबळे, ज्ञानेश्वर कोतकर, विशाल घागस यांसह पदाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची भेट घेत निवेदन दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा - छावा सेना appeared first on पुढारी.