
येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पुरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. यात चोरट्याने 32 इंची एलईडी टीव्ही चोरून नेला होता. मात्र, चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या अवळल्या आहेत.
पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी या प्रकरणाचा तांत्रिकदृष्ट्या तपास करत गुप्त माहितीच्या आधारे प्रभाकर धोंडिराम आवारे (रा. कोळम) यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेला एलईडी टीव्ही सेट परत केला आहे.
हेही वाचा :
- Corona Update : देशभरात कोरोना रुग्णसंख्येत 15 हजार 754 ने वाढ
- नाशिक : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज; पोलिस अधिकार्यांसमवेत आयुक्तांची आढावा बैठक
- नाशिक : मोर्चेकरी अडून बसल्याने पोलिसांचा लाठीमार
The post नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद appeared first on पुढारी.