
चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शिंगवे गावच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रस्त्याच्या कडेला बिबट्या फिरताना आढळून आला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
शिंगवे गावाच्या पंचक्रोशीत मोठा डोंगराळ भाग आहे. या डोंगराळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. हा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गावाकडे येत असल्याने रात्रीच्या वेळी त्याच्या डरकाळ्याचा आवाज येतो. शुक्रवार (दि.२८) हा बिबट्या चांदवड मनमाड रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसला. सध्या, शेती कामांना वेग आल्याने रात्रीबेरात्री शेतकरी घराबाहेर असतात. अशा वेळी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्यास जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या बिबट्याचा वन विभागाने पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शिंगवे पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा
- नाशिक: वांगण येथील शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू
- नाशिक: सुरगाणा-वासदा मार्गावरील उंबरठाणजवळ दरड कोसळली
- नाशिक : रुणमळीत दोन गटात हाणामारी; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाचा हल्ला
The post नाशिक: शिंगवे परिसरात बिबट्याचा वावर, बंदोबस्त करण्याची मागणी appeared first on पुढारी.