नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे

शिंदे गट,www.pudhari.news

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिंदे गटाच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी संजय बच्छाव यांची, तर महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी (दि.20) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. सचिव संजय मोरे यांनी बच्छाव व ताठे यांना नियुक्तिपत्र दिले.

नाशिक जिल्हाप्रमुखपदी अनिल ढिकले, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भाऊलाल तांबडे व नाशिक महानगरप्रमुखपदी प्रवीण तिदमे, युवासेना जिल्हाप्रमुखपदी योगेश म्हस्के यांच्या निवडीनंतर जिल्हा संपर्कप्रमुख पदाचीही निवड मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. शिंदे गटाच्या प्रथम जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा मान संजय बच्छाव यांना मिळाला असून, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी लक्ष्मी ताठे यांना देण्यात आली आहे. ही निवड म्हणजे शिवसेनेमध्ये अनेक वर्षांपासून केलेल्या कामांची व निष्ठेची पावती असून, माझ्यासारख्या सर्वसामान्य महिला शिवसैनिकावर मुख्यमंत्र्यांनी मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरवित आगामी काळात महिला आघाडीची ताकद जिल्हाभरात वाढविणार असून, आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद व मनपावर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकविण्याचा विश्वास व निर्धार लक्ष्मी ताठे यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीप्रसंगी राज्याचे प्रवक्ते नरेश म्हस्के, ना. दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सुजित जिरापुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे appeared first on पुढारी.