नाशिक : शिंदे गटात गेलेले अनेकजण स्वगृही

ठाकरेगट प्रवेश www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेले विनोद नुनसे व नाशिकमधील अनेक पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतले. आता शेवटपर्यंत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही नुनसेंसह सर्वांनी दिली. या सर्वांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आले.

खोटी आश्वासने देऊन तसेच दिशाभूल करून आम्हाला नेण्यात आले होते. परंतु, काही दिवसांतच आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे आणि आपण चुकीच्या लोकांच्या कळपात दाखल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतला, असे स्वगृही परतलेल्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. स्वगृही परत आलेल्यांमध्ये विनोद नुनसे, स्वप्निल गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे, दादू खंडारे, सार्थक तालखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश वाबळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव, राहुल येवले, मनोज राजपूत, दिनेश शिंदे, भावेश पगार यांचा समावेश आहे. यावेळी उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, कुणाल दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, माजी महापौर विनायक पांडे, शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, माजी गटनेते विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल दराडे, वीरेंद्र टिळे, राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : शिंदे गटात गेलेले अनेकजण स्वगृही appeared first on पुढारी.