नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी

शिंदे गट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधून शिंदे गटात दाखल झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या समन्वयक कीर्ती निरगुडे, विभागसंघटक शोभा पवार आणि मंगला भास्कर यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली आहेे. उद्धव ठाकरे गटातील पक्षाचे उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या तिघा पदाधिकार्‍यांचे स्वागत केले.

उपनेते बागूल यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष हाच खरा जनसेवक, समाजसेवक असल्याचे मनोगतात सांगितले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना आता पश्चात्ताप होत असून, स्वगृही परतण्याचे ते मार्ग शोधत असल्याचे बडगुजर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षात जी आपुलकी, जिव्हाळा, आपलेपणा, समाजसेवा करण्याची पद्धत दिसून येते ती शिंदे गटात नसल्याने स्वघरी परतण्याचा निर्णय घेतल्याची भावना निरगुडे व पवार यांनी व्यक्त केली. तर छोट्या भावाकडे योग्य तो मानसन्मान न मिळाल्याने मोठ्या भावाकडे परतण्याचा निर्णय घेतल्याचे भास्कर यांनी सांगितले. याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, पक्षाचे विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा मगर, शोभा गटकळ, प्रेमलता जुन्नरे, वीरेंद्र टिळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : शिंदे गटामधील निरगुडे, पवार, भास्कर यांची घरवापसी appeared first on पुढारी.