नाशिक : शिंदे टोल नाक्यावरील केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी

शिंदे टोल नाका www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोल नाका येथे टोल केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. दोघांवरही नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शनिवारी. दि.24 रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक पुणे रस्त्यावर शिंदे टोल नाका आहे. शिंदे टोल नाक्यावरील केबिन क्रमांक 13 येथे ही घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या एका अवजड वाहनाच्या वाहनाच्या हादऱ्याने ही केबिन कोसळल्याची सांगण्यात येत आहे. केबिन कोसळल्यानंतर आतमध्ये काम करत असलेल्या सुवर्णा जाधव या महील कर्मचाऱ्यावर भिंत कोसळली. त्यामुळे त्यांच्या पाठीला पोटाला व हाताच्या बोटांना दुखापत झाल्याचे कळते. तसेच त्यांचे दुसरे सहकारी धनाजी बोडके हेदेखील या घटनेत जखमी झाले आहेत. दोघांवरील उपचार सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिंदे टोल नाका येथे कर्मचाऱ्यांनी टोल वन आंदोलन केले होते. आपल्या विविध मागण्या मंजूर करण्यासाठी टोलनाका प्रशासनाने एक महिन्याची मुदत मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर काही दिवसातच ही घटना घडल्याने शिंदे टोलनाका प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडू शकते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार तातडीने घटनास्थळी हजर झाले. रात्री उशिरापर्यंत तुंगार रुग्णालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

केबिन कोसळल्याने जखमी कर्मचारी सुवर्णा जाधव यांच्या डोक्याला सूज आलेली आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शिंदे टोल प्रशासनाने सुवर्णा जाधव यांच्या कुटुंबाला त्वरीत आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, तसेच टोल नाक्यावरील केबिनचे बांधकाम सुरक्षित करावे. – संजय तुंगार, माजी जिल्हा परिषद सदस्य.

हेही वाचा :

The post नाशिक : शिंदे टोल नाक्यावरील केबिन कोसळून दोन कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.