Site icon

नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी 
लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला तत्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन नांदगाव तहसिलच्या मार्फत करण्यात आले आहे. जर शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक केले नाही तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबामार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा मिळणारा शिधा लाभापासून वंचित रहावे लागणार आहे.
नांदगाव तालुक्यात एकूण अंत्योदय कार्डसंख्या ८२२४ आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या, १४१०१८ इतकी आहे. यापैकी ९७.२८ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडिंग, ऑनलाइन डाटा नोंद करण्यात आली आहे. तर २.७२ टक्के आधार सिंडीग करणे बाकी आहे. तरी ज्यांचे आधार सिडिंग बाकी असेल त्या लाभार्थांनी येत्या दोन दिवसात म्हणजे २६ मे पर्यंत कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड आणि रेशनकार्डची छायांकित प्रत धान्य दुकानदारांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मयत व्यक्ती किंवा विवाहित मुलीचे नाव कमी करण्यासाठी रेशन दुकानदाराकडे तसा दाखला जमा करून ३१ मे पर्यंत शिधापत्रिकेतून स्वतःहून नाव कमी करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक करणे बाकी आसेल, अशा लाभार्थ्यांनी तत्काळ रेशन दुकानदारांना भेटून  शिधापत्रिकेस आधार कार्ड लिंक करुन घ्यावे. अन्यथा भविष्यात लाभापासून वंचित रहावे लागेल. – डाॅ सिध्दार्थकुमार मोरे, तहसिलदार, नांदगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करा नाहीतर धान्य पुरवठ्याला मुकावे लागणार appeared first on पुढारी.

Exit mobile version