नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरांमध्ये रविवारी (दि.१९) शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, अंबड, इंदिरानगर-पाथर्डी फाटा आदी परिसरात शिवजयंतीची मिरवणूक निघणार असून, मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाचही विभागांतील मिरवणूक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीला वाकडी बारव येथून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे चौक मंडई, जहांगिर मशीद-दादासाहेब फाळके रोड- महात्मा फुले मार्केट-अब्दुल हमीद चौक- भद्रकाली मार्केट- बादशाही कॉर्नर- गाडगे महाराज पुतळा- मेनरोड-धुमाळ पाॅइंट- सांगली बँक सिग्नल- महात्मा गांधी रोड- मेहेर सिग्नल- अशोकस्तंभ- रविवार कारंजा- होळकर पूल- मालेगाव स्टँड- पंचवटी कारंजा- मालवीय चौक- रामकुंड असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

मुख्य मिरवणूक मार्गाने वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पंचवटी एसटी डेपो (२)- निमाणी बसस्थानक तसेच पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचवटी डेपो येथून सुटणार आहेत. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या बसेस व इतर वाहने आडगाव नाका- कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोडसह इतर ठिकाणी मार्गस्थ होतील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल-कन्नमवार पुलावरून रवाना होतील.

पंचवटी विभागात दिंडोरी नाक्याकडून पंचवटी कारंजा-मालेगाव स्टॅण्ड-रविवार कारंजाकडे येणारी व जाणारी वाहतूक तसेच मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. नाशिकरोड विभागात बिटको चौक व सिन्नर फाटा, रेल्वे स्टेशनकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून येणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहतूक तसेच जेलरोड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे बिटको चौकाकडून येणारी वाहने व नांदूर नाका-बिटको चौकाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद असणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.