नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

शिवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने सेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता आहे.

शिवसेना पदाधिकारी नीलेश ऊर्फ बाळा कोकणे यांच्यावर दि.18 जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. हल्लेखोरांवर अद्याप कारवाई न झाल्याने शिवसैनिक संतापले असून, कारवाईत दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून शनिवारी (दि.30) शिवसेनेचा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने विशेष शाखेकडे परवानगी अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे आयुक्तालयाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे विनापरवानगी मोर्चे, आंदोलने करण्यास मनाई लागू झाले आहेत. त्यामुळे विनापरवानगी मोर्चा काढल्यास शिवसैनिकांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.