
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिक महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगसेवक प्रविण तिदमे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत त्यांची शिंदे गटाच्या नाशिक महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकमधून तिदमे यांच्या रुपाने शिंदे गटात पहिलाच मोठा प्रवेश मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एक वर्षासाठी त्यांच्यावर नाशिक शहराच्या महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रविण तिदमे यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने नाशिकमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :
- गोवा : परंपरागत कलेला कल्पकतेची झळाळी
- नाशिक : पोटासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून शेतकऱ्याची जीवघेणी कसरत(व्हिडीओ)
The post नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात appeared first on पुढारी.