नाशिक : शिवसेनेच्या ‘बये दार उघड’ अभियानास प्रारंभ

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व स्तरातील महिलांना सुरक्षा, शक्ती, विकास होण्याबाबत देवी सर्वांना आशीर्वाद देवो. राज्यात स्थिर सरकार येण्यासोबतच महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे. प्रगतीची दारे खुली होऊन त्यांना समाजात योग्य स्थान मिळावे, अशी प्रार्थना शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी चांदवडला श्री रेणुकामातेचे चरणी केली.

नवरात्र उत्सवास नुकतीच सुरुवात झाली आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना उपनेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या पुढाकारातून ‘बये दार उघड’ या मोहिमेचा प्रारंभ चांदवडमध्ये करण्यात आला. यावेळी डॉ. गोर्‍हे यांनी श्री. रेणुकामातेचे दर्शन घेत आरती केली. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी ना. डॉ. गोर्‍हे यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. गोर्‍हे यांनी संस्थानला 11 हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, संगीता खोदाना, नाशिक शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी श्यामल दीक्षित, ओमप्रकाश (भय्या) बाहेती, तहसीलदार प्रदीप पाटील, देवस्थानचे विश्वस्त सुभाष पवार, नितीन आहेर, विलास भवर, संदीप उगले, सोमनाथ पगार, सुरेखा पगार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवसेनेच्या ‘बये दार उघड’ अभियानास प्रारंभ appeared first on पुढारी.