नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान, घरफोडीकडे वळाले ; दोघांकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी www.pudhari.news

नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानंतर घरफोडीकडे वळालेल्या दोघा चोरट्यांनी अजून एका गुह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडे चार किलो चांदीसह सोने असा सुमारे १८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चोरीचे दागिने खरेदी विक्री करणाऱ्या सराफी दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहेत. तुषार रामचंद्र शहाणे (रा.नारायण बापू नगर,जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित सराफाचे नाव आहे.

रोहन भोळे (३५ रा. जयप्रकाश सोसा. विद्यानगरी, ना.रोड) व ऋषीकेश काळे (२६ रा. पदमिनी सोसा. गंधर्वनगरी, ना.रोड) असे संशयित चोरट्यांची नावे आहेत. आतापर्यंत या दोघांकडून तब्बल ५० लाख २४ हजार रूपयांचा चोरीचा मुद्दमाल जप्त केला असून, चौकशीत इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान, घरफोडीकडे वळाले ; दोघांकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.