नाशिक-शेगाव ४५० किलोमीटरचे अंतर चार दिवसांत कापले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासह सायकलची कट्टी पर्यावरणाशी मैत्री, सायकल चालवा आरोग्य सांभाळा याबाबत जनजागृती करण्यासाठी श्री गजानन महाराज भक्त मंडळ नाशिक यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद भांड यांनी सायकलवारीचे आयोजन केले होते. यात ५३ सायकलिस्टने तब्बल ४५० किलोमीटरचे अंतर चार दिवसांत पूर्ण केले.

विशेष म्हणजे प्रत्येक सायकलला सामाजिक संदेशाची स्वतंत्र घोषवाक्याची पाटी लावली होती. आर्वी जिल्हा धुळे येथील शालेय समितीने सायकलवारीचे स्वागत केले. पहिला मुक्काम मालेगाव, दुसरा पारोळा, तिसरा मुक्ताईनगर, चौथा संतनगरी शेगाव असा चार दिवसांचा प्रवास झाला. मंडळाच्या वतीने सायकल मोहीम सायकल वापराचे फायदे याबाबत जनजागृती करण्यात येते. लवकरच सायकल चळवळीच्या प्रसारासाठी श्री गजानन सायकलिस्ट क्लबची स्थापना करण्यात येणार असल्याचे भांड यांनी सांगितले.

शेगाव आनंदवारीचे यंदाचे हे २३ वे वर्ष होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रल्हाद भांड यांच्यासह सुधाकर सोनवणे, अरुण शिंदे, नारायण सुतार, आबासाहेब जाधव, पंकजन के. राजेश्वर सूर्यवंशी, भागवत जाधव, गीता शिंदे, ज्योत्स्ना शितोळे, पूजा शिरसाठ, वेदिका व्यवहारे, अनुजा कुचेकर, पुण्यस्त्री भांड, दातीर आदी यांच्यासह भाविक उपस्थित होते.

The post नाशिक-शेगाव ४५० किलोमीटरचे अंतर चार दिवसांत कापले appeared first on पुढारी.