नाशिक : शेतात कुत्रा शिरल्याने वाद ; तीक्ष्ण हत्याराने वार करुन एकाचा खून

Murder

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील गोळशी शिवारात शेताच्या किरकोळ वादातून तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने एका जणांचा मुत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून, या घटनेतील दोन संशयितांविरोधात दिंडोरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोळशी शिवारातील टीभु पिंगळे यांचा पाळीव कुत्रा लगतच्या सुदाम मुळाणे यांच्या शेतजमिनीत गेल्याने पिंगळे व मुळाणे यांच्यामधे वाद उद्भवला होता. तदनंतर सत्यभामा पिंगळे या शेतीतून भेंडी काढण्याचे काम करत असताना संशयित सुदाम मुळाणे व रविंद्र मुळाणे या ठिकाणी आले व शिवीगाळ करु लागले. यावेळी टीभु तुकाराम पिंगळे रा. गोळशी (70) हे समजावून सांगत असताना रविन्द्र मुळाणे व सुदाम मुळाणे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यापैकी रविंद्र मुळाणे याने टीभु पिंगळे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने डोक्यात व पोटावर झालेल्या दुखापतीमुळे ते गंभीर जखमी झाले होते. पिंगळे यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

सत्यभामा पिंगळे यांनी या घटनेबाबत दिंडोरी पोलीसात फिर्याद दिली असून, संशयित रविंद्र मुळाणे व सुदाम मुळाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोनिका जेजोड करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शेतात कुत्रा शिरल्याने वाद ; तीक्ष्ण हत्याराने वार करुन एकाचा खून appeared first on पुढारी.