नाशिक : शेतात पंप सुरू करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात दहेगाव येथील सोमनाथ शिवाजी शिंदे (३४) यांना शेतातील मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला.

सोमनाथ हे आपल्या शेतातील मका पिकाला शनिवारी पहाटे विद्युत पंपाने पाणी भरण्यासाठी गेले होते. पंप सुरू करत असतानाच त्यांचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आला आणि विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेची नांदगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. सोमनाथ यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी आहे. सोमनाथ घरातील मोठा मुलगा होता. सोमनाथच्या अचानक मृत्यूमुळे शिंदे कुटुंबावर ऐन गणेशोत्सवात दु:खाचा डोंगर कोसळला. दहेगाव परिसरातही या घटनेने शोककळा पसरली.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतात पंप सुरू करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू appeared first on पुढारी.