Site icon

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

द्राक्षबागेच्या ॲंगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत ॲंगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथे शनिवारी (दि. २०) दुपारी 4 च्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (६३) यांची गट नंबर ६५ मध्ये शेती आहे. या शेतात द्राक्षबागेचे ॲगल उचकटले असल्याने ते व्यवस्थित करण्याचे काम मजूर करीत होते. त्याचवेळी शेजारील शेतकरी जयराम रघुनाथ देवरे, मुलगा किरण देवरे, सागर देवरे यांनी, आमच्या शेतातील हद्दीत ॲगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत कटवणीच्या सहाय्याने तिघा संशयितांनी प्रकाश देवरे व सचिन प्रकाश देवरे (३६) यांना गंभीर मारहाण केली. यात सचिन देवरे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रकाश देवरे यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असून ते पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात जयराम रघुनाथ देवरे, सागर देवरे, किरण देवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन कारंडे अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version