नाशिक : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार

accident

शेवगाव; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर दोन दुचाकी वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार झाली असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चापडगाव जवळ मंगळवारी (दि. २४) सांयकाळी हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशोक विक्रम उगले व आवनी अशोक उगले या बाप लेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. विजयादशमीचे सिमोल्लंघन उरकुन मंगळवार (दि. २४) ग्रामसेवक अशोक उगले हे सहकुटूंब दुचाकी वाहनाने बेलगाव येथून शेवगावकडे येत असताना मंगळवार (दि.२४) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेवगाव गेवराई राज्यमार्गावर चापडगाव नजीक एका हॉटेलसमोर समोरुन येणाऱ्या दुचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ग्रामसेवक अशोक विक्रम उगले (वय ३५ रा.बेलगाव हल्ली राहणार शेवगाव) हे जागीच ठार झाले तर त्यांची मुलगी आवनी अशोक उगले वय ८ हिचा बुधवारी सकाळी उपचार चालु असताणा मृत्यु झाला.त्यांच्या पत्नी पुनम अशोक उगले (वय ३२), मुलगा शिवदीप अशोक उगले (वय २ वर्ष) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर समोरुन धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील अमोल रामनाथ नेमाने (रा. चापडगाव) हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान मयत ग्रामसेवक अशोक उगले हे आखेगाव व माळेगाव ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहात होते. बुधवारी (दि.  मयत दोन्ही बाप लेकीवर बेलगाव येथे अत्यंसंस्कार करण्यात आले या घटनेने तालुक्यासह पंचायत समिती कर्मचाऱ्यात शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांनी तुर्त अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

The post नाशिक : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार appeared first on पुढारी.