नाशिक : शौर्य पोलिस पदकाचे हे ठरले मानकरी…

मानकरी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे रविवारी पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील 42 पोलिसांना शौर्य पोलिस पदक जाहीर झाले आहेत. त्यात नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माणिक तुकाराम गायकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील बलराम गीत यांचा समावेश आहे.

नाशिक आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माणिक गायकर यांना गुन्हे शोध व उकलमधील विशेष कामगिरीची दखल घेत यंदाचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. मूळचे नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील असलेेले गायकर हे नाशिक पोलिस दलात 1988 मध्ये पोलिस शिपाई या पदावर भरती झाले. 2021 मध्ये पवननगर येथे ब्युटीपार्लरमध्ये घुसून पॅरोलवरील सराईत गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गायकर यांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली होती. त्यांना आत्तापर्यंत 197 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सुनील गीत यांना पोलिस सेवेतील विशेष कामगिरीबद्दल पोलिस पदक जाहीर झाले आहे. सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील मूळ रहिवासी असलेले गीत हे 1990 मध्ये नाशिक पोलिस दलात पोलिस शिपाई पदावर भरती झाले. मालेगाव शहर, महामार्ग ट्रॅफिक आणि सीआयडीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना 130 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : शौर्य पोलिस पदकाचे हे ठरले मानकरी... appeared first on पुढारी.