नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा

देवळा www.pudhari.news

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण १६३८ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एकूण ७० टक्के मतदान झाले. रविवार (दि.8) सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदान शांततेत पार पडले तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी साडे चार वाजता सुरू होणार आहे.  त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, मतदान प्रक्रिया कामी सहायक निबंधक सुजय पोटे मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन आहेत. तर १३ जागांसाठी एकूण २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले असून दोन पॅनलमध्ये सरळ लढत रंगली होती. या सर्व उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूकीत ७० टक्के मतदान ; सर्व उमेदवारांचा विजयाचा दावा appeared first on पुढारी.