नाशिक : श्री श्री रविशंकर यांचा मंगळवारी महासत्संग

श्री श्री रविशंकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आर्ट ऑफ लिव्हिंगला ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ६ ला ठक्कर डोम मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २३ फेब्रुवारीला ठक्कर डोम मैदानापासून बाइक रॅलीत १५० बाइकस्वार सहभागी होणार असून, सकाळी ११ ला मैदानापासून जेहान सर्कल, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, एबीबी सर्कल मार्गे गोविंदनगरपर्यंत रॅली निघणार आहे. २५ ते २६ फेब्रुवारी दरम्यान मॉल्समध्ये फ्लॅश मॉबच्या माध्यमातून ज्ञानगंगा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाईल. त्याचबरोबर महाविद्यालये, शाळा, विद्यापीठांमध्ये ध्यान शिबिर, रक्तदान शिबिर, राेग निदान, महिलांसाठी हळदीकुंकवाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत महासत्संग, ज्ञानगंगा व सामूहिक श्रीरामरक्षा पठण कार्यक्रम आयोजित केले असून, सामूहिक श्रीरामरक्षा पठण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नियोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे उल्हास पाटील, स्मृती ठाकूर, विजय हाके, चिराग पाटील, किशोर पाटील, नीलम गायधनी, प्रसाद पिंपळे विशेष प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : श्री श्री रविशंकर यांचा मंगळवारी महासत्संग appeared first on पुढारी.