नाशिक : संघटनांनी एकत्र येण्याचे महाराष्ट्र शिक्षक न्याय हक्क परिषदेचे आवाहन

शिक्षक

 नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद प्राथमिक शिक्षकांना शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये मतदान करता यावे यासाठी लढा उभा केला आहे. महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद सर्वच स्तरावर हक्क मिळवण्यासाठी प्रयत्नांत आहे. एकीकडे न्यायलयीन लढाई सुरू असतांना प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी एकत्र येणे गरजेचे असून आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षक विधानपरिषद निवडणूकांमध्ये प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाही. माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मतदानाचा हक्क बजावत असतात. मग प्राथमिक शिक्षक मतदानापासून वंचित का ? हा लढा अधिक व्यापक स्वरूपात लढण्याची आवशकता आहे. प्राथमिक शिक्षक हा मूलभूत कर्तव्य बजावण्यापासून उपेक्षित आहे. शालेय शिक्षणाचा पाया बालवयापासून रुजवणारे गुरुजी आजही अनेक प्रश्न सोडवण्यासाठी हक्काच्या आमदाराच्या प्रतीक्षेत आहेत. विधिमंडळात प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मांडण्यासाठी आपल्या हक्काचा आमदार असल्याच्या भावना शिक्षकांमध्ये आहेत. त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

Chandwad www.pudhari.news

एकतेत ताकत असते, एकीचे बळ कार्यसिद्धीकडे नेत असते. महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेमार्फत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्रित निवेदन आणि चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यासाठी संघटनांनी एकत्र यावे उत्तर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी ह्या लढ्यात एकत्रित होण्यासाठी संपर्क करा. – सारांश भावसार, महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष.

हेही वाचा:

The post नाशिक : संघटनांनी एकत्र येण्याचे महाराष्ट्र शिक्षक न्याय हक्क परिषदेचे आवाहन appeared first on पुढारी.