नाशिक : संजीव नगरला युवकाचा खून, २ महिन्यांत चौथा खून

file photo

सिडको : पुढारी वृत्तसेवा; अंबड पोलिस ठाणे परिसर खुनाने हादरला आहे. अंबड लिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी युवकाच्या मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन महिन्यात या भागात चार खून झाले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सदरेआलम मोहम्मद शब्बीर शेख (वय २०,रा. संजीनगर) याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. यात युवक जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंबड लिंक रोड भागातील संजीवनगर परिसरातील नुरी मस्जीद मागे मोकळ्या मैदानावर घडली. या घटनेची माहिती अंबड पोलिसांना रात्री साडे दहा वाजता समजली. यानंतर पोलिस आयुक्त नाईकनवरे उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर गंभीर जखमी शेख याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शेख याचा खून करणारे अज्ञात हल्लेखोरांचा अंबड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

अंबड पोलिस ठाणे येथे दोन महिन्यांत चार खून

अंबड पोलिस ठाणेच्या हद्दीत अंबड औद्योगिक वसाहतीत उत्पादक व्यवस्थापक तसेच त्रिमूर्ती चौकात एक खून त्यानंतर दहा दिवसांपूर्वी चुंचाळे येथे पत्नीचा खून व संजीवनगर भागात चौथा खून झाला आहे.

The post नाशिक : संजीव नगरला युवकाचा खून, २ महिन्यांत चौथा खून appeared first on पुढारी.