नाशिक : संसरी गावात युवकाकडून दाम्पत्यास मारहाण; धारदार शस्त्राने हल्ला

नाशिक : संसरीगाव परिसरात युवकाने दाम्पत्यास मारहाण करीत धारदार शस्त्राने दुखापत केल्याची घटना रविवारी (दि.४) सायंकाळी घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी संशयित आकाश विलास गायखे (२३, रा. संसरीगाव) यास अटक केली आहे.

गौतम अरुण सैंदाणे (४०, रा. संसरी गाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते अमिता गायखे यांच्याकडे आकाश विरोधात तक्रार करत असताना आकाशने तेथे येऊन सैंदाणे दाम्पत्यास शिवीगाळ करीत मारहाण केली. धारदार वस्तूने गौतम यांच्या हातास दुखापत केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकाशविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : संसरी गावात युवकाकडून दाम्पत्यास मारहाण; धारदार शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.