नाशिक : संस्थेसाठी उपयुक्त व्यक्तींची भेट घेणार : मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे

मविप्र नितीन ठाकरे www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था महाराष्ट्रात नावलौकीक प्राप्त अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या शैक्षणिक हित अन प्रगतीसाठी आवश्यक अशा सर्व व्यक्तींची भेट घेऊ, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी (दि.२९) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन कार्यकारी मंडळाचा सत्कार समारंभ व नॅक मूल्यांकन अ श्रेणी आनंदोत्सव कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ॲड. ठाकरे म्हणाले, मराठा विद्या प्रसारक निवडणुकीत सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला असून तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कामकाज करणार आहोत. एसव्हीकेटी कॉलेजमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले आहे. शहरातील इतर नामवंत महाविद्यालयाच्या क्षमतेचे महाविद्यालय म्हणून एसव्हीकेटी महाविद्यालय असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्याचप्रमाणे महाविद्यालयातील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यासाठी बससुविधा तसेच येथील प्रलंबित जागेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही म्हटले. सनदी लेखापाल सदाशिवराव धुर्जड हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी समाजाच्या विस्तार अन् विकासासाठी प्रयन्त करणार्‍या समाजधुरींच्या पावलावर पाऊल ठेवत विद्यमान संचालक मंडळाने ॲड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, विजय करंजकर, सचिन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांनी प्रास्ताविक केले. नूतन कार्यकारी मंडळाचा हभप द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या हस्ते नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, संचालक रमेश पिंगळे, ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. संदीप गुळवे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. आर. के. बच्छाव, शिवा पाटील-गडाख, महीला संचालिका शोभा बोरस्ते, सेवक संचालक डॉ. संजय शिंदे, चंद्रजित शिंदे, शिक्षणाधिकारी अजित मोरे आदींना सत्कार करण्यात आला.

एसव्हीकेटी महाविद्यालयाला नॅक अ मानांकन प्राप्त झाल्याबददल प्राचार्य डॉ. विजय मेधणे व समिती सदस्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला ॲड. एन. जी. गायकवाड, त्र्यंबकदादा गायकवाड, रघुनाथ देवकर, कौसल्या मुळाणे, विजय करंजकर, बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, उत्तम कासार, दिनकर पाळदे, विलास धुर्जड, ॲड. अशोक आडके, सोमनाथ खताळे, गजीराम मुठाळ, विनय हगवणे, बाबुराव काळे, रमेश धोंगडे, किशोर जाचक, चंद्रकांत गोडसे, सुधाकर गोडसे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खंडेराव मेढे, उपाध्यक्ष वैभव पाळदे, अरुण जाधव, आदींसह सभासद, नागरिक उपस्थित होते. डॉ. मनीषा आहेर यांनी सुत्रसंचलन केले. माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : संस्थेसाठी उपयुक्त व्यक्तींची भेट घेणार : मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे appeared first on पुढारी.