नाशिक: सटाणा येथील मोर्चानंतर तरुणांची वाहनांवर तुफान दगडफेक

सटाणा: पुढारी वृत्तसेवा :  मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सटाणा शहरात शनिवारी (दि.२९) दुपारी आदिवासी संघटनांनी काढलेल्या विराट अर्ध नग्न मोर्चा संपल्यानंतर परत जाणाऱ्या आंदोलकांपैकी काही युवकांनी राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. यामुळे किमान ५० हून अधिक वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. साहजिकच यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: सटाणा येथील मोर्चानंतर तरुणांची वाहनांवर तुफान दगडफेक appeared first on पुढारी.