नाशिक : सदाशिव नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकावर हल्ला

कुत्र्याचा हल्ला,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सदाशिव नगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून या कुत्र्यांनी जेष्ठ नागरिकावर हल्ला करून चावा घेत जखमी केले आहे. मनपाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे यांनी केली आहे.

सदाशिव नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट कुत्र्यांनी आज बुधवार दुपारी यशवंत मोतीराम मगर या जेष्ठ नागरिकावर हल्ला करून हातावर चावा घेतला. या नंतर जखमी मगर यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी देखील खूप वेळा अशा प्रकारे नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत.  याठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले खेळत असतात. तसेच शाळेला, क्लासला जात-येत असतात. त्यामुळे लहानमुलांना देखील या कुत्र्यांपासून धोका आहे. नाशिक महानगरपालिकेने ताबडतोब या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे यांनी दिला आहे.

The post नाशिक : सदाशिव नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकावर हल्ला appeared first on पुढारी.