नाशिक : सप्तशृंगी घाटात रात्री दरड कोसळली

सप्तशृंगीगड; तुषार बर्डे : सप्तशृंगी गडावरील गणेश घाटात रात्री एक वाजता मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवत हानी झाली नाही.

सप्तशृंगी गडावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. एक वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याची माहिती येथील रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांना दूरध्वनी वरून दिली. बेनके यांनी त्वरित सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व प्रशासनास याची माहिती दिली. यावेळी रात्री वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक घटनास्थळी रात्री दोनच्या सुमारास दाखल झाले.

रस्त्यावर पडलेल्या दगडांना जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक अधिकारी जॉन भालेकर, पराग कुलकर्णी, रुपेश गवळी, रवींद्र पवार, नितीन गुजर ,यांनी बचाव कार्य केले.

हेही वाचा

The post नाशिक : सप्तशृंगी घाटात रात्री दरड कोसळली appeared first on पुढारी.