नाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्‍याचा हल्ला

बंधूक हल्ला www.pudhari.news

नाशिक (घोटी)  : पुढारी वृत्तसेवा
मुंबईहून नाशिककडे सरकारी ठेकेदार पंकज ठाकरे (रा वडाळा रोड, इंदिरानगर नाशिक) हे आपल्या कारमधून (एमएच-15/जीएल-2233) येत असताना मुंढेगाव शिवारात अचानक त्यांच्या गाडीला एक कार पुढे आल्याने ठाकरे यांनी आपली कार थांबवली. समोरील गाडीमधून पाच जण खाली उतरले. त्यामधील एकाकडे बंदूक होती इतर चार जणांच्या हातात लोखंडी रॉड होते. या टोळक्याने तोंडावर रुमाल बांधलेले होते. ठाकरे यांना मारण्याच्या तथा लुटीच्या इराद्याने समोरील काच त्यांनी रॉडने तोडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत ठाकरे यांनी आपली गाडीला वेगाने मागच्या बाजूला वळवून गाडी त्याठिकाणाहून वेगाने नाशिकच्या दिशेने नेली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला अन्यथा काही वेगळीच घटना घडू शकली असती. याप्रकरणी संशयितांविरोधात पुढील तपास सहा पोलीस पोलीस निरीक्षक श्रध्दा घंदास, हवालदार पंकज दराडे, सुहास गोसावी, संदीप मथुरे, भास्कर महाले, श्रीकांत दोंदे आदी करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्‍याचा हल्ला appeared first on पुढारी.