
नांदूर शिंगोटे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील निमोण नाका परिसरात असणाऱ्या सरकारमान्य देशी दारू दुकानचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क 40 बॉक्स लांबविले.
याबाबत सविस्तर होत असे की, या ठिकाणी सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केल्यानंतर दुकानदार घरी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देशी दारूच्या पाठीमागील दरवाजाचे दोन्ही कुलूप तोडून दुकानातील सीसीटीव्ही फिरवून दुकानांमध्ये प्रवेश केला. समोरील दरवाजा उघडून दुकानाला गाडी लावून दुकानातील प्रिन्स कंपनीचे 180 मिली दारूअसलेले 27 बॉक्स, नव्वद मिली दारू असलेले दहा बॉक्स, सातशे पन्नास मिली असलेले दोन बॉक्स व बाजीगर कंपनीचे 180 मिली चे एक बॉक्स असा एकंदरीत सर्व माल दीड लाखाच्या आसपास व गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
सदरचा प्रकार सकाळी दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी ही सर्व हकीगत पोलीस स्टेशनला दिली. नांदूर पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी कदम यांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला. यापूर्वीही या दुकानातील दारूचे बॉक्स चोरीला गेलेले आहे.
वावी पोलीस स्टेशनचे हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर-ओपीचे कदम तपास करत आहे.
हेही वाचा :
- वंचित बालकांसाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’; लसीकरणासाठी उपक्रम
- Ajit Pawar Birthday : ‘मी…मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….!’ मिटकरींच्या ट्विटची चर्चा
- आळंदीत 1730 लहान मुलांना डोळ्यांचा संसर्ग
The post नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, appeared first on पुढारी.