नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा

बिबट्यासाठी पिंजरा,www.pudhari.news

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

चार दिवसांपूर्वी सह्याद्रीनगर भागात नर बिबट्या जेरबंद केल्यानंतर या भागात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केल्याने वनविभागाकडून पुन्हा या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. सोमवारी (दि. 17) हा बिबट्या विठ्ठल गावंडे यांच्या घरालगत लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. मात्र याच भागात अजूनही बिबटे असून त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली होती.

त्याची दखल घेत शुक्रवारी (दि. 21) सकाळी वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रीनगरला पिंजरा लावण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिक बबन कांडेकरसह इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी वनअधिकारी यांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नका तसेच हातात टॉर्च घेऊनच बाहेर पडावे, अशा सूचना केल्या.

हेही वाचा :

The post नाशिक : सह्याद्रीनगरला बिबट्यासाठी पुन्हा पिंजरा appeared first on पुढारी.