नाशिक : साठ वर्षीय महिलेवर बावीस वर्षीय तरुणाकडून बलात्कार

देवळा; पुढारी वृत्तसेवा : मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने बावीस वर्षीय तरुणाने साठ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. मंगळवार (दि.९) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. आरोपीला बुधवारी (दि.१०) कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सागर बुवाजी तलवारे (वय २२) रा.गुंजाळनगर) याने मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने घरात घुसला. त्यानंतर वयोवृद्ध महिलेवर घरात एकटी असल्याचे पाहून बलात्कार केल्याची घटना घडली.  यावेळी महिलेचा गळा दाबत डोके भिंतीवर आदळून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर व डोक्याला दुखापत करत जबरदस्ती केली. या झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी देत सदर महिलेचा पाचशे रुपये किमतीचा मोबाईल घरातून घेत पळून गेला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. त्यास बुधवारी कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, ज्योती गोसावी आदी करीत आहेत. एका निष्णात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपीला कडक शिक्षा व्हाव, अशी मागणी करण्यात आली आहे.

The post नाशिक : साठ वर्षीय महिलेवर बावीस वर्षीय तरुणाकडून बलात्कार appeared first on पुढारी.