Site icon

नाशिक : साडेपाच लाखाच्या दागिन्यांसह बुलटचोर गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी बंद घराचा कडी कोयंडा उचकटून साडेपाच लाखाचे दागिने आणि बुलेट चोरून नेणाऱ्या सराईत चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर केवळ दोन दिवसात तपास लावून अट्टल चोराला मुद्देमालासह अटक केल्याने उपनगर पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेलरोडच्या दसक, गणेश कॉलनी मधील तिरुपती बंगल्यात राहणारे राहुल संतोष डगळे हे कुटूंबिया समावेत नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून साडेपाच लाख रुपये किंमतीचे १६ तोळे सोने आणि तेरा तोळे चांदीचे दागिने व बुलेट गाडी चोरून नेली होती. याबाबत उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी घटनास्थळी पाहणी करत शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे, एम. वाय. गोळे, पोलीस हवालदार संजय ताजने, विनोद लखन, राहुल जगताप, सूरज गवळी, पंकज कर्पे यांनी तपास सुरू केला. यामध्ये जयभवानीरोडवरील फर्नांडिस वाडीत राहणारा किरण रतन पाटील याने घरफोडी केल्याचे समजले. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्याकडून चोरून नेलेले सोने व बुलेट असा पाच लाख 44 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. किरण पाटील हा सराईत गुन्हेगार असून आयुक्तालयातील अनेक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हयाची नोंद आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे व पथकाचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी अभिनंदन केले. उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात चोराच्या मुसक्या अवळ्याने पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : साडेपाच लाखाच्या दागिन्यांसह बुलटचोर गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version