
नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, येथील पदभार सहायक पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांना विशेष शाखेत, तर गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश घोटेकर यांना उपनगर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.
पोलिस आयुक्तालयामार्फत प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राजू पठाण यांना प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशोकनगरमध्ये सावकारीच्या जाचाला कंटाळून दोन मुलांसह पित्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर सावकारांविरोधात वातावरण तापले असताना, या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या सावकारांवर काहीही कारवाई झाली नाही. त्यातील फरार सावकारांचा नंतर शोधही घेण्यात आला नाही. त्यामुळेच या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे बोलले जात आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा पदभार किती वेळ आहे माहीत नाही. मात्र, सातपूर परिसरात दहशत पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राजू पठाण यांनी दिला आहे.
हेही वाचा :
- नाशिक : मराठी शाळांना घरघर, पण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
- अकोले : अगस्ती साखर कारखान्याची ऊस लागवड योजना जाहीर
- Sensex Opening Bell: आठवड्याची सुरुवात पडझडीने, सेंसेक्ससह निफ्टीतही घसरण
The post नाशिक : सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.