
नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर विभागामधील सर्व मुख्य रस्त्यावरील बांधकाम व्यावसायिक, हॉटेल, क्लासेस व इतर व्यावसायिकांचे अनधिकृत फलक आणि होर्डिंग्जमुळे परिसराच्या विद्रुपीकरणात वाढ झाली होती. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच अतिरिक्त उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या आदेशानुसार सातपूर विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या सूचनेनुसार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. लिपीक मिलिंद जाधव, भगवान सूर्यवंशी, शेखर शिंदे, मारुती शिंदे, संजय मोरे, सुरेश वाबळे व वाहनचालक प्रमोद आव्हाळे यांनी पथकाद्वारे अनधिकृत होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर्स हटविले.
हेही वाचा:
- उंडवडी : भटक्या कुत्र्यांच्या उच्छाद पाळीव जनावरे, नागरिकांवर हल्ले
- पंढरपूर : अवैध वाळू उपसा विरोधात सलग तीन दिवस कारवाई; २ तराफा, १७ होड्या केल्या नष्ट
- Ranbir Kapoor Animal : हातात सिगारेट, रक्ताने माखलेली कुऱ्हाड…रणबीरचा ‘एनिमल’ लूक लक्षवेधी
The post नाशिक : सातपूरमध्ये अनधिकृत फलक हटाव मोहीम appeared first on पुढारी.