नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी

सातपूर www.pudhari.news

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीजवळील गणेशनगरातील मनपाच्या गणेश उद्यानातील चंदनाची तीन मोठी झाडे चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तोडून त्यातील बुंधे घेऊन गेले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पावन गणेश उद्यानात मध्यरात्री चंदनाच्या तीन झाडाचा बुंधा अत्याधुनिक कटरने कापून त्यातील सुवासिक गाभा काढून नेला आहे. सातपूर भागात चंदन चोरीच्या घटना सुरूच आहेत. पोस्ट ऑफिसमधील दोन चंदनाचे, सातपूर कॉलनी सार्वजनिक उद्यान, कंपन्या, बंगले या ठिकाणांहून चंदन झाडाच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन जुलै रोजी समतानगर येथून घरासमोरील गेटजवळ असलेले चंदनाचे झाड मध्यरात्री तोडून नेताना रहिवासी जागे झाले असता त्यांना चोरट्यांनी कटर दाखवत बुंधा कापून नेला होता.

हेही वाचा:

The post नाशिक : सातपूरला मनपा उद्यानातील चंदनाच्या तीन झाडांची चोरी appeared first on पुढारी.