सातपूर : पुढारी वृत्तसेवा
सातपूरला एका कर्मचाऱ्याचा खड्ड्याने बळी घेतला. सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिराजवळून ४१ वर्षीय राजकुमार सिंग हे दुचाकीवरून (एमएच १५ सीपी २७०८) जात असताना रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात ते घसरले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या आयशरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.
पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत
श्रमिकनगर येथे राहणारे राजकुमारसिंह हे सोमवारी (दि. २८) सकाळी कामावर जाण्यासाठी घरून दुचाकीवरून निघाले होते. सकाळी ८ वाजेच्यासुमारास सातपूर-अंबड लिंकरोडवर दत्त मंदिर परिसरातखड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वाहन रस्त्यावरील खडी वरून घसरले. याचवेळी तेथून जाणाऱ्या आयशरखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला.
नाशिक शहरात पावसाने उघडीप दिली आहे. रिमझिप पावसाळामुळे अनेक मोठ्या रस्त्यांची दैना झालेली आहे. अंबड लिंकरोड वर गॅस पाइपलाइनसाठी खोदलेले खड्डे वरवर बुजविल्याने त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे झाले आहेत. यामुळे खड्ड्यांत दुचाकी आदळणे, पडणे, वाहनांना वाहनांचे धक्के लागणे अशा घटना घडत आहेत. तर खड्ड्यांमधून वाहनचालक कशीबशी वाट काढत आहेत.
हेही वाचा :
- आता अंगणवाडीसेविका चालविणार पाळणाघर!
- सरड्याप्रमाणे रंग बदलणारा मासा
- लेखापरीक्षण विरोधातील गोकुळची याचिका फेटाळली
The post नाशिक : सातपूर-अंबडलिंकरोडवर खड्डा चुकूविण्याच्या नादात कामगाराचा मृत्यू appeared first on पुढारी.