
नाशिक: पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील प्लास्टिक भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
सातपूर-अंबड लिंक रोडवर कच-यामुळे आणि गोदामाला वारंवार लागणा-या आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत आले आहे. त्या निमित्ताने येथील भंगार गाेदामाच्या समस्यांचे निरसन करावे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा निर्दशनास आले आहे. गोदामामुळे सारख्या घडणा-या आगींच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा:
- अतिक्रमणांवर धडक कारवाई; मुंढव्यातील 70 अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
- सोलापूर : चोराने विहिरीत उडी मारून जीव गमावला
- सोलापूर : आठ किलोमीटर अंतरातील फाटक बंद करा
The post नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत appeared first on पुढारी.