नाशिक : सापडलेली पैशांची बॅग महिलेस केली परत

हरवलेली बॅग केली परत
नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

श्रमिकनगर रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना महिलेची पैशांची बॅग हरवली होती. ती बॅग ज्ञानेश्वर थोरात व पंढरीनाथ काकड यांना सापडली. त्यांनी ती बॅग महिलेस परत केली आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातपूर कॉलनी येथील महिला सुमिती बस्ते या श्रमिकनगर येथून सातपूर कॉलनी येथे जात असताना त्यांच्याकडे असलेली पैशांची बॅग श्रमिक नगर रस्त्यावर हरवली होती. या बॅगेत रोख रक्कम पंचवीस हजार रूपये व महत्त्वाची कागदपत्रे होती. ज्ञानेश्वर थोरात व पंढरीनाथ काकड यांना ती बॅग रस्त्यावर मिळाली. त्यांनी ती खोलून बघितली असता त्यामध्ये महत्वाची कागदपत्रे व रोख रक्कम पंचवीस हजार रुपये होते.  बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महिलेचा शोध घेतला व महिलेस बॅग परत केली. यावेळी ज्ञानेश्वर थोरात, पंढरीनाथ काकड, वाळुबा थोरात, अनिल बस्ते, ओम अहिरे, साजीद शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : सापडलेली पैशांची बॅग महिलेस केली परत appeared first on पुढारी.