नाशिक : सायकलस्वारास मारहाण करुन लुटले; चौघांना अटक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
गुरेवाडी परिसरातून डुबेरेकडे जाणार्‍या रस्त्यावर चार जणांनी एका सायकलस्वारास अडवून जबर मारहाण करत मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे रामभाऊ भाऊसाहेब लोणारे (48) हे सोमवारी (दि. 14) सायंकाळी 4.30 च्या सुमारास आपल्या सायकलने गुरेवाडी फाटा येथून नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येत होते. यावेळी डुबेरेकडे जाणार्‍या पुलाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण करून मोबाइल आणि सायकलही हिसकवण्याचा प्रयत्न केला. लोणारे यांनी प्रतिकार करत तेथून पळ काढला व सिन्नर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी मनोज पावसे (रा. ढोकी फाटा), दुर्गेश रत्नाकर, समाधान शिंदे (रा. डुबेरे) आणि एका संशयितास अटक केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सायकलस्वारास मारहाण करुन लुटले; चौघांना अटक appeared first on पुढारी.