नाशिक : सायकल खेळण्यावरून वृद्धेला मारहाण; अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल,www.pudhari.news

 नाशिक सिडको : लहान मुलीच्या सायकल खेळण्यावरून तिच्या आजीला शिवीगाळ तसेच मारहाण, दमदाटी करीत जातिवाचक बोलून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवारी (दि. ७) रात्री ९:३० च्या सुमारास पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर येथील कॉलनीत ५ वर्षांची चिमुकली सायकल खेळत होती. त्यावेळी संशयित विजय सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी (रा. पाथर्डी फाटा, ज्ञानेश्वरनगर) हे सायकल खेळणाऱ्या चिमुकलीला काहीतरी चुकीचे बोलले. याबाबत चिमुकलीची आजी संशयित सूर्यवंशीला जाब विचारण्यास गेली असता, सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नीने आजीला शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : सायकल खेळण्यावरून वृद्धेला मारहाण; अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.