नाशिक : सिक्युरिटी प्रेस सोसायटीत कामगार पॅनल विजय

प्रेस नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगार सहकारी क्रेडिट सोसायटीच्या शनिवारी (दि.५) झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखालील कामगार पॅनलचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले. गेली ६८ वर्षांपासून कामगार पॅनलकडे सत्ता असून ती कायम राहिली आहे. सोसायटीच्या १७२४ मतदारांपैकी 1659 मतदारांनी हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश सानप आणि चंद्रकांत चव्हाणके त्यांना मदतनीस म्हणून काम पाहिले. 

विजयी उमेदवार असे…

सर्वसाधरण गट: जगदीश गोडसे (1158), ज्ञानेश्वर जुंद्रे (1133) श्रीपाद काजळे (1013), सुनील गायधनी ( 1020), उमेश गोडसे (1012), संदीप गांगुर्डे ( 1032), राजेश चव्हाण (952), सुनील नाईक (919), पोपट निगळ (908), राजाराम लांडगे ( 949)

भटक्या-विमुक्त जाती-जमाती: हिरामण आव्हाड (1133),

अनुसूचित जाती-जमाती: गणेश काळे (1044)

इतर मागास प्रवर्ग: प्रकाश निकम (1001),

महिला राखीव: सुनंदा कटाळे (1113), सुवर्णा तेजाळे (1093)

हेही वाचा:

The post नाशिक : सिक्युरिटी प्रेस सोसायटीत कामगार पॅनल विजय appeared first on पुढारी.