Site icon

नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंब ठाणे हद्दीतील सिडको भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. अंबड पोलिसांनी दीड महिण्यात सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे व रेकॉर्डवरील १२ गुन्हेगार तडीपार केले आहे तर २२ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविले आहेत. तसेच १० गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकूण ५४ गुन्हेगारांचे तडीपारी प्रस्ताव केल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी दिली. तर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून ४२ तडीपार प्रस्तावांमध्ये काेण-कोणाची नावे आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंबड पोलिस ठाणेच्या हद्दीत सिडको , खुटवडनगर, उंटवाडी, कामटवाडे, डिजीपीनगर, चुंचाळे, अंबड लिक रोड, अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत परिसर आहे. अंबडगाव, अंबड औद्योगिक वसाहत, तसेच चुंचाळेसाठी पोलिस ठाणेप्रमाणे काम चालणारे स्वतंत्र पोलिस चौकी निर्मिती केली आहे. सिडको व परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. यात दोनपेक्षा जास्त गुन्हे असणारे गुन्हेगार तसेच सामाजिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे गुन्हेगार तसेच पोलिस रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार यांची माहिती जमा करून त्यांच्यावर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यासाठी पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विभाग स्थापन करून माहिती संकलीत केली जात आहे.

अंबड पोलिसांच्या १२ गुन्हेगारांच्या तडीपारी प्रस्तावास पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी १२ गुन्हेगारांना नाशिकबाहेर इतर जिल्ह्यात रवाना केले आहे. या शिवाय बहुतांश गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलिस शिपाई राकेश पाटील, सुधीर आव्हाड, नितीन सानप, गणेश झनकर आदी काम करत आहेत. गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिजली यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडकोतून १२ गुन्हेगार तडीपार; एकूण ५४ गुन्हेगारांचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Exit mobile version