नाशिक : सिडकोवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार : सुधाकर बडगुजर

सुधाकर बडगुजर www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
इंद्रनगरी, कामटवाडे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवतो. या भागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाड्या व सफाई कामगार नियमित येत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, अशा तक्रारींचा पाढा परिसरातील महिलांनी वाचला आणि त्या आशयाचे निवेदन सुधाकर बडगुजर यांना दिले होते.

निवेदनाची तातडीने दखल घेत बडगुजर यांनी महापालिका प्रशासनाचे याबाबत लक्ष वेधले. त्यानंतर तातडीने चक्रे फिरली आणि पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे, बांधकाम विभागाचे विनीत बिडवई यांनी बडगुजर तसेच शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले, जितेंद्र भालेराव, राजेंद्र सुतार, सुभाष शुकले, दिनेश तेली, डॉ. शरद बगडाने, रोहित शिंदे, परिसरातील महिला साधना मटाले, उज्ज्वला अहिरे, पूनम महाजन, संगीता घाडगे, विजया शिरोडे, मीना पाटील, ललिता पवार, कमिका गवळी, रूपाली देशमुख आदींसमवेत परिसराचा दौरा करून प्रत्यक्ष समस्यांची पाहणी केली. जलवाहिनी जोडणीचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांनी कर्मचारीवर्गास दिल्याने दोन दिवसांत परिसरातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल. तसेच घंटागाड्या नियमित कशा धावतील याचे वेळापत्रक निश्चितीचे आदेश या अधिकार्‍यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडकोवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.