नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडको तसेच पाथर्डी फाटा परिसरातील शिवसेनेचे माजी पदाधिकारी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिक शहरातील शिवसेनेचे माजी उपमहानगर संघटक प्रकाश दोंदे, पाथर्डी फाटा येथील शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख संत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. यावेळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत साठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रविण (बंटी तिदमे) आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश appeared first on पुढारी.