नाशिक सिडको : बडदेनगर ते पाटीलनगर अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी

सिडको,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

जुने सिडकोतील बडदेनगर ते पाटील नगर अर्धवट केलेला रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. या नंतर पहाणीसाठी आलेल्या मनपा बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना नागरिकांनी घेराव घातला.

महानगर पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून जुने सिडकोतील बडदेनगर ते पाटील नगर असा रस्ता तयार केला परंतु या रस्त्याच्या मध्यभागी भूसंपादन झालेले नसल्याने मनपाने तो भाग सोडून ८० टक्के रस्त्याचे काम केले आहे. हा रस्ता जुने सिडको व नविन सिडको पाटीलनगर व परिसराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. अर्धवट रस्त्यामुळे नागरिक व वाहन चालकांचे हाल होत आहेत. मनपाने भूसंपादन करून अर्धवट रस्ता पूर्ण करावा या साठी नाईक नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल नाईक, कविता नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस सिडकोचे उपाध्यक्ष कृष्णा काळे, संतोष भुजबळ, सुनील घुगे, अमोल पैठणकर, रोहित नाईक, गौरव पाटील, अमोल तुपे, गणेश आहेर, विजय खाडे, कृष्णा मंडलिक, मनोहर पाटील, अशोक करंके, डॉक्टर सचिन दहिवलकर, संदीप रावते, अविनाश चव्हाण, धनंजय थेटे, नंदकुमार भोर, अतुल पाटील, भालचंद्र थोरात, युवराज गायकवाड, प्रमोद नानकर, अशोक जोशी, सदानंद कवडे, विनायक जोशी, लक्ष्मण धात्रक, नितेश भामरे, प्रदीप ठाकूर, विकास नाईक, योगेश जाधव, अभीदत्त पाटील, मेघना भारोटे, सुमती भारंबे, संद्या कुनगर, लावण्या गौड, ललिता जाधव, रंजना शिनकर, हेमलता जोशी, सविता चौधरी, वैशाली गायकवाड, रूपाली ठाकूर, स्वाती नांद्रे, सरिता गायकवाड, भारती सावंत, स्वाती गाडेकर, प्राजक्ता गाडेकर आदींनी सोमवारी दुपारी रस्त्यावर आंदोलन केले.

या नंतर मनपा सिडको विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र ठाकुर यांना पाचारण करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी ठाकूर यांनाच घेराव घालून आंदोलन केले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

मनपाने शहरातील सर्व ठिकाणी भुसंपादन केले आहे. परंतु पाटीलनगर ते बडदेनगर अर्धवट रस्त्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.
अमोल नाईक
रा.यु . कॉंग्रेस, सिडको

हेही वाचा :

The post नाशिक सिडको : बडदेनगर ते पाटीलनगर अर्धवट रस्ता पूर्ण करण्याची मागणी appeared first on पुढारी.